सविनय कायदेभंग चळवळ (महत्त्वाचे मुद्दे)
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदे भंग करण्याचा निर्णय घेतला
मिठाचा सत्याग्रह-
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली.
12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकार्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले.
सुमारे 385 किमी च्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली.
5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले.
सहा एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला.
पेशावरचा सत्याग्रह-
वायव्य सरहद्द प्रांतात हां अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते.
त्यांन सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी’ खुदा इ खिदमतगार’ या संघटनेची स्थापना केली.
23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथेसत्याग्रह सुरू केला.
सोलापूरचा सत्याग्रह-
सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला.
सरकारने मार्शल लो म्हणजेच लष्करी कायदा जारी केला, आंदोलन दडपण्यात आले
या आंदोलनात आघाडीवर होते मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुरबान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले.
धारासना सत्याग्रह-
गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.
महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा याठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले.
जिथे मिठागरे नव्हती तिथे लोकांनी जंगल विषयक कायदे मांडायला सुरुवात केली.
महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले.
बाबू गेनू चे बलिदान-
मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू झाले.
मुंबईतील गिरणी मध्ये काम करणारे बापू गेनू सेद या आंदोलनात आघाडीवर होते.
त्यांचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले.
गोलमेज परिषद-
भारतीय संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे मत होते. याकरिता त्यांनी लंडनमध्ये एक परिषदेचे आयोजन केले या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हंटले जाते.
पहिला गोलमेज परिषद-
रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते
गांधी-आयर्विन करार-
महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय आयर्विन यांच्यात समझोता झाला; यालाच गांधी-आयर्विन करार असे म्हणतात
दुसरी गोलमेज परिषद-
1931 दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले
पुणे करार-
राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली
राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही विनंती मान्य केली
1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे
तिसरी गोलमेज परिषद-
नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंड मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला, त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली.
सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी-
एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपवले