.एका वाक्यात उत्तरे लिहा
- इतिहास म्हणजे काय?
➤ भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय .
- इतिहास हा शब्द कसा तयार झाला ?
- इतिहास या शब्दाचा अर्थ काय ?
- इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे घटक कोणते ?
- इतिहासाची किती साधने असतात ?
- इतिहासाची कोणकोणती साधने आहे ?
- भौतिक साधनंमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो ?
- इतिहासाची भौतिक साधने म्हणजे काय?
➤ स्मारके, इमारती ,लेणी ,शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले या अवशेष यालाच इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात.
- स्मारकामध्ये कोणते प्रकारांचा समावेश होतो ?
➤स्मारकामध्ये समाधी ,कबर, वीरगळ यांचा समावेश होतो.
- इमारतीमध्ये कशाकशाचा समावेश होतो?
➤ इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो.
- शिलालेख म्हणजे काय?
➤ शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख.
- नाण्यांवर काय काय माहिती मिळते?
➤नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादिची माहिती मिळते
.
- ताम्रपट म्हणजे काय?
➤तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख यालाच ‘ताम्रपट असे म्हणत म्हणतात .
- किल्ल्यांमध्ये कोणती महत्वाची प्रकार असतात?
➤ किल्ल्यांमध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, इत्यादी महत्त्वाची प्रकार असतात.
- विविध राजकर्त्यांनी कोणत्या कोणकोणत्या धातूंचा उपयोग करून नाणी बनवली?
➤विविध राज्यकर्त्यांनी सोने. चांदी. सोने चांदी तांबे या धातू धातूंचा उपयोग करून नाणी बनवली.
- पेशव्यांच्या नाण्यांवर कोणकोणत्या भाषेचा वापर होत?
➤पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत
- कोण कोणत्या राज्याच्या काळातील शिलालेख मिळालेले आहे?
➤चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहे
- शीलालेखापासून कोणकोणत्या समजायला मदत होते?
➤शीलालेखापासून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते
- .ताम्रपटावर कोणकोणत्या प्रकारची माहिती कोरलेली असे?
➤ताम्रपटावर राजाज्ञा, निवडे इत्यादी प्रकाराची माहिती कोरलेली असे
- चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मगबरे, गुरुद्वरा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार गावकुस, पेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व काय आहे?
➤ही सर्व भौतिक साधने आहेत
- परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी आपली प्रवासवर्णने मध्ये काय काय लिहिले होते?
➤परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी आपली प्रवासवर्णने मध्ये अल्बिरूनी, इब्नबतूता, निकोलस मनूची यांचा समावेश होतो
.
- बाबराचे चरित्र, श्रीशिवभारत हे चरित्र कोणी लिहिले?
➤बाबराचे चरित्र, श्री शिवभारत हे चरित्र कवी परमानंद यांनी लिहिलेले आहेत.
- तवारीख म्हणजे काय?
➤तवारीख म्हणजे तारीख
- तवारीख किंवा तारीख म्हणजे काय?
➤तवारीख युवा तारीख म्हणजे घटनाक्रम.
- अल्बिरूनी, जियाउद्दिन बर्नी, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यांनी काय लिहिले?
➤अल्बिरूनी, जियाउद्दिन बर्नी, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यांनी घटनाक्रम लिहिले.
- खबर म्हणजे काय?
➤खबर म्हणजे बातमी
- बखर हा प्रकार कोठे निर्माण झाला?
➤बखर हा प्रकार महाराष्ट्रात निर्माण झाला.
- बखरीतून कोणकोणत्या बाबी कळायला मदत होते?
➤ बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषाव्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते.
- मराठीतील बखरे कोणती?
➤महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खड्ड्याच्या लढाईची बखर या बकरी मराठीत आहे.
- लिखित साधने म्हणजे काय?
➤देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लीपची वळने, विविध भागांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या., ग्रंथ, फर्माने, चरित्रे, चित्रे या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात
- मौखिक साधने म्हणजे काय?
➤लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या ,लोकगीते, पोवाडा, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोक जीवनाची विविध पैलू समजतात. अशाप्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात.
- मौखिक साधने मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो?
➤लोकगीते ,गाथा ,श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके इत्यादी बाबींचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो
- तानाजीचा पोवाड्याचा कर्ता कोण?
➤तानाजीच्या पोवाड्याचा करता तुळशीदास शाहीर हे आहे.
- तानाजीच्या पोवाड्यात कोण कोणत्या मोहिमेचा वर्णन केला आहे ?
➤तानाजीचा पोवाडा यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन केले गेले आहे
- तानाजीचा पोवाडा कोण कोणाची सुंदर स्वभाव चित्रे दिली आहेत?
➤ तानाजीचा पोवाडा यात शेलारमामा, शिवाजी महाराज, तानाजी, वीर माता जिजाबाई यांची सुंदर चित्रे दिली आहेत
रिकामी जागी योग्य शब्द भरा.
- सम्राट अकबराच्या नाण्यांवर __________चित्र होते
शिव-पार्वतीचे
राम सितेचे
राधा कृष्णाचे
उत्तर: राम सीतेचे
- तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातले ___________ .
ताम्रपट
शिलालेख
लेख
उत्तर: लेख
- शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि आणि_________पुरावा मानला जातो.
अविश्वसनीय
विश्वसनीय
उत्तर: विश्वसनीय
- परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी आपली_______ लिहिली आहे
बकरी
प्रवासवर्णन
उत्तर: प्रवासवर्णन
- इतिहास हा ----------------- पुराव्यांवर आधारीत असावा लागतो .
अविश्वसनीय
विश्वसनीय
उत्तर: विश्वसनीय
बखर हा शब्द ________ या शब्दावरून आला
तवारीख
खबर
मगर
उत्तर: खबर
हैदरअलीच्या नाण्यांवर___________ यांची प्रतिमा होती
राम सीतेची
राधा कृष्णाची
शिवपार्वतीची
उत्तर: शिवपार्वती
रॉबर्ट आर्म, एम. सी.स्प्रिंग अल आणि ग्रेट दस-या________ _______इतिहास कारकांचे ग्रंथ हे महत्त्वाचे आहेत
विश्वस्य अविश्वसनीय
समकालीन पाश्चात्य
उत्तर: समकालीन पाश्चात्य
प्र.3 थोडक्यात उत्तरे लिहा.
इतिहासिक साधनांचे मूल्यमापन करताना काय काय शोधावे लागते?
➤ ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करताना त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते.
इतिहासिक साधनांचे मूल्यमापन करताना कशाचा विचार करावा लागतो?
➤ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करताना अंतर्गत प्रमाण के पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो लेखकाचा खरे-खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते लेखनातील अति शक्ती, प्रतिमा, प्रतीके अलंकार यांचाही विचार करावा लागतो.
ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन आचे वापर करताना तारतम्य का ठेवावी लागतात?
➤ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापनाचे वापर करताना आपल्याला मिळालेली माहिती, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता न काढता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते.
No comments:
Post a Comment